Latest News

श्री जंगदबा देवी मंदीर जागा मोजणीस न्यायालयाची सक्त मनाई

Share Post

महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असलेले राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिर यांच्या मंदिराची मोजणी करण्याचा आदेश माननीय जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर यांनी दिले होते.

परंतु मंदिर व मंदिर परिसरातील तसेच लगतचे असणारे वहिवाटदार व जागा मालक यांनी ह्या मोजणीबाबत आक्षेप घेत माननीय कर्जत येथील सिव्हिल जज्ज, वरिष्ठ स्तर न्यायालय कर्जत येथे सदरच्या मोजणी बाबत मनाई हुकूमाची मागणी केली होती यावर माननीय न्यायालयाने सर्व कागदपत्रे तसेच दाव्यातील वादी अडवोकेट सचिन अरुण रेणुकर व लक्ष्मीकांत दत्तात्रय क्षीरसागर यांचे म्हणणे ग्राह्य धरून मंदिराची मिळकत सिटी सर्वे नंबर १०५१ च्या मोजणी करण्यास सक्त मनाई केलेली आहे.

सदरच्या दाव्याची पूर्ण सुनावणी होईपर्यंत मा. जिल्हा अधिकारी साहेब अहिल्यानगर व मा. उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय कर्जत यांच्या अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारचे मंदिराचे दाव्याचा अंतिम निकाल लागेपावेतो मोजणी न करण्याच्या आदेश में. कर्जत येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालयाने दिलेले आहेत.सदर दाव्यामध्ये वादी तर्फे अॅड. पी. एस. रेणुकर या कामकाज पाहत आहेत सदर दाव्यात त्यांना एडवोकेट एन. एस. दोभाडा यांनी सहकार्य करत आहेत.

श्री जंगदबा देवी मंदीर जागा मोजणीस न्यायालयाची सक्त मनाई