Daily UpdateEntertainmentLaunch

‘ओह माय डॉग’ चित्रपटाच्या पुण्यातील विशेष प्री-रिलीज स्क्रीनिंगला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Share Post

७ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘ओह माय डॉग’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी पुण्यात विशेष प्री-रिलीज स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले. या खास कार्यक्रमाला अभिनेते जितेंद्र जोशी आणि विजय मिश्रा उपस्थित होते.

अभिनेते जितेंद्र जोशी म्हणाले चित्रपटाची भावनिक कथा, प्रभावी अभिनय आणि माणूस व कुत्रा यांच्यातील हृदयस्पर्शी नात्याचे संवेदनशील चित्रण याचे विशेष कौतुक करण्यात आले. अनेकांनी हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा असल्याचे सांगत, प्रेम, करुणा आणि सहानुभूतीचा संदेश देणारा हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा असल्याचे मत व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, “प्रेक्षकांना ‘ओह माय डॉग’सोबत हसताना, आनंद घेताना आणि भावनिकरित्या जोडले जाताना पाहणे आमच्यासाठी अत्यंत समाधानकारक अनुभव आहे.”

बाबूलाल बिस्कोप आणि थिंकिंग हॅट्स एंटरटेनमेंट यांच्या बॅनरखाली अमित राय, राजेश भारद्वाज आणि सना वारसी यांनी निर्मित केलेल्या ‘ओह माय डॉग’ मध्ये माही राय, पंकज त्रिपाठी, गीता अग्रवाल शर्मा, राजेश कुमार, पवन मल्होत्रा, सुलाख्याना बरुआ, विजय मिश्रा यांच्यासह कॅनाईन स्टार्स ऑस्कर आणि ब्रुनो तसेच २५० हून अधिक कुत्रे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. हा चित्रपट ७ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘ओह माय डॉग’ चित्रपटाच्या पुण्यातील विशेष प्री-रिलीज स्क्रीनिंगला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
‘ओह माय डॉग’ चित्रपटाच्या पुण्यातील विशेष प्री-रिलीज स्क्रीनिंगला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद