
पुण्यात रंगणार भारताची पहिली ‘ग्लोबल गणेश वाट’; ८ देशांतील नागरिक जोडले जाणार पुण्याच्या गणेशोत्सवाशी!
पुण्याच्या समृद्ध गणेशोत्सवाची परंपरा, इतिहास आणि वारसा जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी ‘संस्कृती’ (SansCreatee) तर्फे ‘ग्लोबल गणेश वाट’ या अनोख्या सांस्कृतिक खजिना शोध (ट्रेझर हंट) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश चतुर्थीच्या वीकेंडला, १९ आणि २० सप्टेंबर २०२६ रोजी पुण्यातील जंगली महाराज (जे. एम.) रस्त्यावर ही स्पर्धा रंगणार आहे.पुण्यात रंगणार भारताची पहिली ‘ग्लोबल गणेश वाट’; ८ देशांतील नागरिक जोडले जाणार पुण्याच्या गणेशोत्सवाशी!
कार्यक्रमाची रूपरेषा
- तारीख: १९ आणि २० सप्टेंबर २०२६ (गणेश चतुर्थी वीकेंड)
- परिसर: जे. एम. रोड (सुमारे ५ किमी क्षेत्र; सुरुवात व सांगता जे. एम. रोडवरच)
- वेबसाइट: www.sanscreatee.com
- नोंदणी व माहिती: +91 751 751 0899
स्पर्धेची प्रमुख आकर्षणे
- पुणे ते फुकेत सांस्कृतिक सेतू: स्पर्धेतील विजेत्यांना थायलंडमधील फुकेत येथील श्रीमंत गणपती बाप्पा देवळाई (प्रती दगडूशेठ) येथे कुटुंबासह सहलीची संधी मिळणार आहे.
- पुणेकर NRI एडिशन: अमेरिका, यूके, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कतार, मलेशिया आणि थायलंड या ८ देशांतील अनिवासी भारतीय (NRI) कुटुंबे WhatsApp द्वारे पुण्यातील आपल्या पथकांना रिअल-टाइम मार्गदर्शन करतील.
- सांस्कृतिक खजिना शोध: कुटुंबे, विद्यार्थी आणि तरुण भाविक इतिहास व परंपरेवर आधारित सांस्कृतिक सुगावे (Clues) शोधत पुण्याचा वारसा प्रत्यक्ष अनुभवतील.
“पुण्याची गणपती परंपरा नव्या आणि मनोरंजक पद्धतीने जगभरात पोहोचवणे हा यामागचा हेतू आहे. देश-विदेशातील गणेशभक्तांना एका सूत्रात बांधणारा हा एक जागतिक अनुभव ठरेल.”
— निसर्ग उदेशी (संस्कृती / SansCreatee)
या उपक्रमासाठी ‘निसर्गशाळा’ कॅम्पसाइट भागीदार, ‘मावळा बोर्डगेम्स’ हे बोर्डगेम्स भागीदार असून, ‘डिस्कव्हर पुणे’चे माधुर बर्वे यांनी खजिना शोधातील सुगाव्यांची रचना केली आहे.

