महाराष्ट्र दिनानिमित्त कर्तृत्ववान मान्यवरांचा गौरव; श्री. संतोष नारायण पाचांगणे यांना पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार 2026’ सोहळ्याचा भव्य कार्यक्रम पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले डॉ. राजेंद्र कोपते (संस्थापक अध्यक्ष, पोलीस मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी हरिदास भिसे तसेच सौ. भारती तुपे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन सुनील गोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन अजय (पाटील) राजमाने यांनी केले.
समाजासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मान मिळायलाच हवा, या उदात्त विचारातून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन हरिदास भिसे यांनी समारोप प्रसंगी केले.यावेळी श्री. संतोष नारायण पाचांगणे यांना सामाजिक कार्य तसेच उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याबद्दल समाजातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


